येताय ना.. सिंधुदुर्गच्या (तोंडवळीच्या) सफारीवर…..!

कोकण म्हटल तर डोळयांसमोर येतात स्वच्छ व शांत सागर किनारे, आंबा-काजू, नारळी-पोफळीच्या बागा, तांबडी माती.

आम्ही हरवलो आहोत इथल्या माडांच्या हिरव्याकंच झाडीत, सागर लाटांमध्ये, ऐतिहासिक गड-किल्ल्यांमध्ये, अस्सल कोकणी स्वादातमनमोकळया कोकणी सह्दयी माणसांमध्ये,
तुम्हालाही निमंत्रण आहे.

तोंडवळी सर्वाच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी तंबू निवास, पर्यटन निवास उभारलेत
. त्यामुळे संपूर्ण गावात कोठेही राहण्या-जेवण्याची अडचण भासणार नाही…..

…मग येताय ना… सिंधुदुर्गच्या (तोंडवळीच्या) सफारीवर….!